बंगळुरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. कर्नाटक सरकारने धर्म किंवा जात असा कोणताही भेदभाव न करता 5 कल्याणकारी योजना याच आर्थिक वर्षात अंमलात आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्रकारांना सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्न भाग्य, शक्ती व युवा निधी या योजना राबविण्याचे वचन देण्यात आले होते. सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला 2000 रुपये मासिक मदत, दारिद्य्र रेषेखालील कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ मोफत, तसेच दोन्ही 18 ते 25 वयोगटातील बेरोजगार पदवीधर तरुणांसाठी दरमहा रु.3000 व बेरोजगार पदविका धारकांसाठी दरमहा 1500 रुपये भत्ता तसेच एसटी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास या योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.
हे ही वाचा :
महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या
राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!
दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी
महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर
महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात
नोकरीच्या बातम्या :
मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती