Sunday, December 8, 2024
Homeराज्यब्रेकिंग : महाडमध्ये ३० घरांवर दरड कोसळल्याची घटना, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची...

ब्रेकिंग : महाडमध्ये ३० घरांवर दरड कोसळल्याची घटना, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

रायगड : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असल्याचे वृत्त समोर येत आहे.

महाडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे महाडमधील तळई गावात ३० हून अधिक घरांवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत जवळपास ७० ते ७५ नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळते आहे. मात्र, अद्याप यात काही जीवितहानी झाली आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही.

मुसळधार पावसामुळे घटनास्थळी अद्याप कोणतेही बचाव कार्य सुरू झालेले नाही, मात्र NDRF च्या काही तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या असल्याचे समजते आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वीच अशीच घटना पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडली होती. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय