संग्रहित छायाचित्र |
रत्नागिरी : आदिवासी एकता परिषद द्वारा आयोजित 29 वे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन राजस्थानमधील प्रतापगड येथे होणार आहे. दिनांक 13, 14 व 15 जानेवारी 2022 रोजी हे महासंमेलन मल्टीपर्पज इण्डोर स्टेडीयमच्या जवळ, बगवास, प्रतापगड राजस्थान या ठिकाणी होणार आहे.
हे महासंमेलन राष्ट्रीय स्तरावरचे असून या संमेलनात देशभरातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दादरा नगर हवेली, उत्तराखंड, झारखंड, आसाम, राजस्थान, गोवा इत्यादी विविध भागातील आदिवासी बांधव लाखो संख्येने उपस्थित राहतात.
हेही वाचा ! …आता शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा उद्देश
या महासंमेलनात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. आदिवासी अस्तित्व, आदिवासी इतिहास, संस्कृती, अस्मिता, आत्मसन्मान, स्वाभिमान, समूह नेतृत्व, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ज्ञान, विज्ञान, कला, शिक्षण, बेरोजगारी, शोषणमुक्त विकास आणि विषमतेच्या आधारावर असलेल्या व्यवस्थेचा विरोधात एक वैचारिक चळवळ म्हणून हे महासंमेलन आयोजित केले जाते. या संमेलनात जगभरातील अनेक बुद्धीजीवी लोक सहभागी होतात.
मानव – मानव मध्ये होत असलेले संघर्ष आणि प्रकृती मधला संघर्ष नष्ट झाला पाहिजे. परंतु मानव समाजातील आप आपसातील करूणा, संवेदनशीलता, सत्य, अहिंसा, त्याग होऊन विकास झाला पाहिजे होता. परंतु आज विकासाच्या नावावर भौतिकवाद, व र्चस्व वाद, पुंजीवाद आणि भोगवादाच्या कारण मानव आणि प्रकृतीच्या अमर्यादित शोषण होत आहे. ज्यामुळे पृथ्वीवर मानवामानवामध्ये भेद होत आहेत. भुखमारी, उत्पीडन, हिंसा, युद्ध, संवेदनशीलता, महामारी, प्रकृती आणि पर्यावरण मध्ये जसे अवकाळी पाऊस, महापूर, भूकंप, अतिवृष्टी, ओलादुष्काळ, चक्रिवादळ, तापमानात वाढ, यामुळे मानवी जीवनावर संकट वाढत आहे.
हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !
पारंपारिक वाद्य, संगीत, नृत्य व पेहरावाचा समावेश
या व्यवस्थेच्या विरोधात या वर्षीचे कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 13, 14, 15 जानेवारी 2022 ला संमेलन घेऊन समाज जीवन बदल्याच्या उद्धेशाने प्रतापगड राजस्थान येथे या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महासंमेलनात नाटके, नृत्य पथक, ढोल, मांदळ, थाळी तूर, बीरी, पावा या पारंपारिक वाद्य संगितासोबत जीवन फुलविणारे गीत गात यावे, असे आवाहन आदिवासी एकता परिषद तर्फे करण्यात आले आहे.
महासंमेलन व्यवस्थापन समितीत अनेक आदिवासी संघटनेसोबत बिरसा फायटर्स या संघटनेचाही समावेश असून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी या महासंमेलनात शामिल होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.
हेही वाचा ! केरळमधील सरकारी शाळेचे लिंगभेदभावविरोधात पाऊल
हेही वाचा ! ‘सरकार काम करत नाही, तर आम्हाला कलेक्टर करा’ आदिवासी विद्यार्थीनी प्रशासनावर संतापली