बुलढाणा : बुलढाण्याच्या स्थानिक संगम तलावानजीकच्या स्मशानभूमीत रविवारी एकाच वेळी 20 चिता पेटल्या आणि काळीज हेलावणारा सामूहिक आक्रोश झाला. शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 24 जणांच्या पार्थिवांना दुपारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अग्नी दिला.
तर नागपूर येथील झेया शेख यांचे पार्थिव बुलढाण्यातीलच कब्रस्थानात दफन करण्यात आले. मृतांची ओळख पटवणे कठीण असल्याने आणि पार्थि मोठी गर्दी केली होती. साडेसात क्विंटल लाकूड, अडीच हजार गोवऱया आणि धार्मिक विधीसह 20 चिता रचून 24 पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘ईडी’ग्रस्त राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये सामील – मानव कांबळे
लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू
शिरुरमधील गंगावणे कुटुंबियांचे आमदार महेश लांडगेंकडून सांत्वन

