Saturday, December 7, 2024
Homeग्रामीणराजूर रेल्वेने सायडिंगच्या रॅम्प बनविण्यासाठी खणला २० फूट खोल खड्डा, जीविताची हानी...

राजूर रेल्वेने सायडिंगच्या रॅम्प बनविण्यासाठी खणला २० फूट खोल खड्डा, जीविताची हानी होण्याची शक्यता

राजूर कॉलरी : राजूर येथे रेल्वे प्रशासनाकडून सायडिंगचा रॅम्प बनविण्यासाठी गावात २० फूट खोल खड्डा तयार करण्यात आला आहे. आता या खड्ड्यावरून नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच पावसाचे पाणी तुडुंब भरून रहिवासी क्षेत्रात शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजूर येथे विविध कंपन्या असून त्यांना आपल्या कोळशाची वाहतूक करण्यासाठी सायडिंग ची आवश्यकता आहे. येथे रेल्वे कडे भरपूर जागा उपलब्ध असल्याने आणि रेल्वेचा फायदा वाढवायचा असल्याने येथे सायडिंग च्या संख्येत वाढ करीत आहे. सायडिंग तयार करण्यासाठी रॅम्प बनविण्याची गरज आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात माती, मुरुमाची आवश्यकता आहे. जमिनीवरील माती किंवा जमिनीखालील मुरूम वापरायचे असेल तर महाराष्ट्र शासनाच्या गौण खनिज कायद्या प्रमाणे शासनाची परवानगी घ्यावी लागते. रेल्वे विभागाने गावालगत असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात २० फूट खोल खड्डा खणून मुरूम काढला व सायडिंग बनविण्यासाठी वापरला.

सायडिंग बनाविल्यानंतर तो खड्डा तसाच मोकळा सोडला. आता पावसाळा असल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने तो खड्डा आता जीवितास हानी करणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच प्रशासनाने वेळीच चौकशी करून संबंधित विभागावर कार्यवाही करावी व ह्या खड्ड्या पासून कोणाचा जीवितास हानी पोहोचणार नाही, यांची दक्षता घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय