Sunday, December 8, 2024
HomeNewsउत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे बलात्कार करून 2 सख्या बहिणींची हत्या ;...

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे बलात्कार करून 2 सख्या बहिणींची हत्या ; यावर योगी आदित्यनाथ म्हणाले की…!

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील निघासन ठाणे क्षेत्रातील एका गावात १५ आणि १७ वर्षीय बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर या दोन्ही बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवण्यात आले होते.
या घटनेनंतर पोलिसांनी सहा आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींपैकी पाचजण मुस्लिम तर एकजण हिंदू आहे. या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

बुधवारी, दुपारी २ वाजताच्या सुमारास आरोपी या दोन्ही बहिणींना बळजबरीने आपल्यासोबत उसाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह एका झाडावर टांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी छोटू, जुनेद, सोहेल, हफिजुल रहेमान, करीमुद्दीन आणि आरीफ या सहा जणांना अटक केली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत जुनेद जखमी झाला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे लखीमपूरचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले. दरम्यान, सर्व आरोपींना फाशी, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि भरपाई अशी मागणी पीडित बहिणींच्या कुटुंबीयांनी केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृत मुलींच्या कुटुंबासाठी पक्के घर तयार करून त्यांची शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात तपास करून, महिन्याभराच्या आत दोषींना शिक्षा झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय