Thursday, April 25, 2024
HomeNewsमध्यप्रदेशात भारतीय हवाईदलाची 2 विमाने कोसळली 1 वैमानिक शहीद

मध्यप्रदेशात भारतीय हवाईदलाची 2 विमाने कोसळली 1 वैमानिक शहीद

ग्वाल्हेर:भारतीय हवाई दलाची (IAF) दोन विमाने – सुखोई-30 आणि मिराज 200 – शनिवारी (28 जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ कोसळली.या विमानानी ग्वाल्हेर हवाई तळावरून सरावासाठी उड्डाण केले होते.या विमानांची एकमेकांशी टक्कर झाली की नाही,याची चौकशी सुरू आहे.

सुखोई-30 मध्ये दोन पायलट होते.एक वैमानिक मृत्युमुखी पडला आहे. तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पायलट सुरक्षित आहेत, तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर लवकरच तिसर्‍या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या संपर्कात आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय