Thursday, April 25, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआयएसी इंडिया मध्ये १९,२६७ रुपयांचा वेतनवाढ करार, चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ...

आयएसी इंडिया मध्ये १९,२६७ रुपयांचा वेतनवाढ करार, चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ करार

चाकण, दि. ९ : चाकण औद्योगिक वसाहाती मधील निघोजे येथील IAC India pvt. Ltd. प्लॅन्ट १, प्लॅन्ट २ चे व्यस्थापन व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे व युनियन अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे आणि मा. कामगार आयुक्त सुनील बागल, मा.कामगार उपआयुक्त संभाजी काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर सह्या झाले.

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे
१) एकूण पगारवाढ : १९२६७/- ( एकोणविस हजार दोनशे सदुसष्ट रुपये)
पगाराचा रेशो: पहिल्या वर्षी ७०% दुसऱ्या वर्षी १५% तिसऱ्या वर्षी १५% मिळणार.

२) कराराचा कालावधी :
०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२४ या तीन वर्षांचा राहील.

३) मेडिक्लेम पॉलीसी :
कुटुंबातील एका व्यक्तीस ३,००,०००/- रुपये या प्रमाणे चार व्यक्तींसाठी १२,००,०००/- रुपयांची पॉलिसी राहणार संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, आणि मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे.

४) मृत्यू साहाय्य योजना :
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व जादाचा मोबदला पुढील पॉलिसी प्रमाणे कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.

५) ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी :
मासिक ग्रॉस पगाराच्या ७२ पट म्हणजेच सरासरी ३६,८०,००० रुपये रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल.

६) टर्म इन्शुरन्स पॉलीसी :
जर एखाद्या कामगाराचा कंपनीमध्ये किंवा कंपनी बाहेर नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या वारसास वार्षिक ग्रास पेमेंटच्या ४ (चार) पट २४,५१,०००/- रुपये एवढी रक्कम मिळेल.

७) सूटया :
A) PL – १९,
B) SL – ११
C) CL – ११
D) PH – ११

E) मतदानाची सुट्टी :
सरकारी आदेशानुसार राहील,

८) दिवाळी बोनस :
सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा पगाराच्या व्यतिरीक्त २०% या प्रमाणे देण्यात येईल.

९) मासिक हजेरी बक्षीस :
ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून ७५० ( सातशे पन्नास) रुपये देण्यात येईल.

१०) सेवा बक्षीस :
A) ५ वर्षे नोकरी झाल्यास ५,०००
B ) १० वर्षे नोकरी झाल्यास १२,५००

११) बक्षीस योजना :
कामगारांच्या मुला मुलींसाठी त्यांची गुणवत्ता पाहून बक्षीस देण्याचे मान्य.
१ ते ७ वी :- ८०% ते ९०% – १०००/- रुपये आणि ९०% च्या पुढे १५००/- रुपये,
८ वी ते १० वी :- ८०% ते ९०% – १५००/- रुपये आणि ९०% च्या पुढे २०००/- रुपये,

१२) वैद्यकीय कर्ज सुविधा :
प्रत्येक कामगारास १०००००/- (एक लाख) रुपये देण्याचे मान्य, तसेच यापेक्ष्या जास्त रक्कम हवी असल्यास एकत्रित चर्चा करून मदत करण्यात येईल.

१३) ड्रेस :
a) उच्च प्रतीचे टी शर्ट वर्षाला – १,
b) पूर्ण ड्रेस – २,
c) शूज – २०००/- रुपये किंमतीचे,
d) हिवाळी जर्किंग – तीन वर्षाला एक मिळणार,
e) पावसाळी रेनकोट – प्रत्येक वर्षाला एक मिळणार.

१४) गुणवंत कामगार पुरस्कार :
प्रत्येक वर्षी दोन गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना ८०००/- (आठ हजार) रुपये एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य,

१५) पाळी भत्ता :
तिसरे पाळीसाठी १००/- रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य.

१६) प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १६ महिन्याचा फरक ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये देण्यात येणार आहे.

करारावर संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष शाम सुळके, खजिनदार अमृत चौधरी, प्रशांत पाडेकर, महादेव येळवंडे, रविंद्र भालेराव, विजय पाटील, दत्तात्रय गवारे, दत्ता येळवंडे, कुणाल कोळेकर, प्लॅन्ट १ युनिट अध्यक्ष सचिन लांडगे, उपाध्यक्ष विनोद दौंडकर, सरचिटणीस प्रविण गव्हाणे, सहचिटणीस धनंजय झापर्डे, खजिनदार अमित दुधाने, प्लॅन्ट नं.२ युनिट अध्यक्ष उमेश वाडेकर, सरचिटणीस गणेश पापरे, खजिनदार चेतन हुले, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे एच.आर.डायरेक्ट इंडिया हेड दिपाली खैरनार, प्लॅन्ट १ चे प्लॅन्ट हेड. पवन मालसे, प्लॅन्ट २ चे प्लॅन्ट हेड सिनोज मॅथ्यू, एच आर मॅनेजर अनिकेत निळेकर, एच. आर. मॅनेजर ओंकार बडवे, महेश सावंत, गायत्री जोशी, कुमारी कुमुदसिंग यांनी सह्या केल्या.

संघटनेच्या वतीने आमदार महेश लांडगे, एच. आर.डायरेक्ट दिपाली खैरनार, अध्यक्ष जीवन येळवंडे व कंपनी प्लांट हेड.पवन मालसे आणि सिनोज मॅथ्यू यांनी उपस्थित कामगार व व्यवस्थापन यांना मार्गदर्शन केले, प्रास्ताविक एच. आर हेड अनिकेत निळेकर यांनी केले. तसेच सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले, व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी कामगारांनी डिजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय