Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणकोल्हापूर : ग्रामीण रूग्णालयास मिळाली 14 कोटी इतकी भरीव मदत, लवकरच सुरू...

कोल्हापूर : ग्रामीण रूग्णालयास मिळाली 14 कोटी इतकी भरीव मदत, लवकरच सुरू होणार सुसज्ज रुग्णालय

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची ग्वाही

कोल्हापूर (यश रुकडीकर) : किणी येथील ग्रामीण रूग्णालयास तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून आज येथील नियोजित कामाचा आराखडा व जागेची पाहणी सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.

सदर काम लवकरात लवकर सुरू होऊन आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय उभे राहील असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.

रुग्णांना आरोग्य विषयी चांगल्या व उत्कृष्ट सेवा मिळाली पाहिज यासाठी शासनाचा आरोग्य विभाग संकटाच्या काळात निष्ठेने रुग्णसेवा करीत आहे, यापुढच्या काळात जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकार नियोजनबद्ध काम करेल, या हेतूनेच किनी येतील हे रुग्णालय मंजूर केले आहे निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच रुग्णालयाचे काम तात्काळ सुरू केले जाणार असून यामुळे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी लवकरच हे रुग्णालय खुले होणार आहे. 

हे काम मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून आरोग्य सेवेचे प्रश्न सुटणार आहेत. यापुढेही अशीच विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असेन असे देखील राज्यमंत्री यड्रावकर यांनी आश्वासित केले.

यावेळी हातकणंगले मतदार संघाचे आमदार राजू आवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता बी.एल. हजारे, उपअभियंता यु.एस. करांडे, अ‍ॅड. एन.आर. पाटील, उपसरपंच अशोक माळी, किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुहास माने, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व्ही.टी. पंडित, अरहनाथ पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय