12th result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परिक्षांचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. अखेर या परिक्षांच्या निकाला संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 12 वीच्या परिक्षेचा निकाल (12th result) उद्या लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांची प्रतिक्षा संपली असून उद्या 12 वीचा निकाल (HSC result) पाहता येणार आहे.
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाईल. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा या पार पडल्या होत्या. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.
असा पहा 12th result
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी आपला दहावीचा निकाल पाहू शकतात.


हेही वाचा :
धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती
मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई
२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान
ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट
पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !
25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम
ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान
पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर