Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाचिंताजनक : जुन्नर तालुक्यातील 'या' एकाच गावात आहेत ११७ ऍक्टिव रुग्ण ;...

चिंताजनक : जुन्नर तालुक्यातील ‘या’ एकाच गावात आहेत ११७ ऍक्टिव रुग्ण ; १० पेक्षा जास्त ऍक्टिव रुग्ण असणाऱ्या गावांची नावे बघा !

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होताना काही दिसत नाही. दोन दिवसांनंतर आज पुन्हा १८६ नव्याने रुग्णांची भर पडली. तालुक्यातील अनेक गावे ही कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहे. 

तालुक्यातील नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारी नुसार एकाच गावात २० पेक्षा जास्त ऍक्टिव कोरोना बाधित असणाऱ्या गावांची संख्या बावीस आहे तर नव्वदी पार करणाऱ्या गावाची संख्या ४ आहे. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे ओतूर, जुन्नर, नारायणगाव आणि पिंपळवंडी या गावात ऍक्टिव कोरोनाचे रुग्ण आहेत.

सध्या ओतूर ११७, जुन्नर १०२, नारायणगाव ९२, पिंपळवंडी ९२, डिंगोरे ४३, आळे ४१, उदापुर ३८, चिंचोली ३५, बुचकेवाडी ३३, धोलवड २७, शिरोली बु. २७, पिंपरी पेंढार २३, खामुंडी २३, राजुरी २३, कुमशेत २३, येडगाव २१, उंब्रज नं. १ – २१, वडगाव आंनद २०, बेल्हे २०, पिंपळगाव जोगा २०, हिवरे तर्फे नारायणगाव २०, नेतवड २०, मढ १८, ओझर १७, सितेवाडी १६, बोरी बु. १६, तळेरान १५, खोडद १४, बारव १२, वारूळवाडी १२, हिवरे बु. १२, आळेफाटा ११, वडगाव कांदळी ११, गोळेगाव ११ अशी ऍक्टिव रुग्णाची संख्या आहे. 

(ता. ९) मे रोजीच्या आकडेवारीनुसार…

संबंधित लेख

लोकप्रिय