Tuesday, January 21, 2025

सिंधुदुर्ग : उद्या 11 ऑक्टोबर रोजी लखिमपूर घटनेचा आशा व गटप्रवर्तक करणार ‘या’ प्रकारे निषेध !

सिंधुदुर्ग : लखिमपुर येथील आंदोलनातील शेतकरी हत्येच्या निषेधार्थ देशभरातील सर्व शेतकरी संघटना व कामगार संघटना यांच्या वतीने निषेध नोंदवायचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिटू या कामगार संघटनेची बैठक देखील संपन्न झाली. त्यानंतर सीटू संलग्न कामगार संघटना या संपात सहभागी होऊन निषेध नोंदवणार आहेत.

त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक या उद्या सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी आपले काम करत असताना काळी रिबन दंडाला बांधून, किंवा काळे ब्लाऊज, काळी ओढणी परिधान करून या घटनेचा निषेध करणार असल्याची माहिती, संघटनेच्या जिल्हा सचिव विजयाराणी पाटील यांनी दिली.

तसेच महाविकास आघाडीने देशातील ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदाची हाक दिली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles