Friday, December 6, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : राज्यात २२२ जागांवर महायुती आघाडीवर तर महाविकास आघाडीचा धुव्वा

मोठी बातमी : राज्यात २२२ जागांवर महायुती आघाडीवर तर महाविकास आघाडीचा धुव्वा

Maharashtra Assembly Election Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्या पासून सुरू झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) मतांची मोजणी सुरू केली असून राज्यात महायुती आघाडी २२२ जागांवर आघाडीवर असल्याचे आता पर्यंत हाती आलेल्या कलावरून दिसून येत आहे. (मोठी बातमी)

दुपारी १ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारी नुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये भाजप १२६, शिंदे शिवसेना ५६, अजित पवार राष्ट्रवादी ३९ असून महायुती एकूण २२२ जागांवर आघाडीवर आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस १९, ठाकरे शिवसेना १९, शरद पवार राष्ट्रवादी १२ असून एकूण केवळ ४९ जागांवर पुढे आहे. इतर पक्षांना १७ जागांवर आघाडी मिळवण्यात यश आले आहे. (मोठी बातमी)

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणुक आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुक होत आहे. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसल्याचे दिसून येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय